शुक्रवार, २८ एप्रिल, २०२३

बात सांगते लाखाची

बात सांगते लाखाची
सत्यावर असत्य हे
आले करितच मात
त्यात केला शपथेने
       पहा आणखी आघात॥धृ॥
शपथेने सत्यतेचा
केला पुरताच घात
वेश सत्याचा घेऊन
           खोटे मिरते जगात॥१॥
खरे रहाते केवळ
रडगाणे गात गात
सत्यतेच्या संघर्षाची
        अशी होते वाताहात॥२॥
सत्य सत्याचे पटेना
कधी जनमानसात 
एक दिवस सत्याचा 
        पण येतो प्रकाशात॥३॥
मग रहावे लागते  
असत्याला भर्कटत
खोलवर कोसळते
        अंधाराच्या गर्ततेत॥४॥
गती तून अधोगती 
खोटे असते साधत
सोडा म्हणून जन हो
  अशी खोट्याची आदत॥५॥
सदा लाभते खोट्याची
अशी अपुरीच साथ
एक लाखाची सांगते
      पहा मंगला ही बात॥६॥
   --निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी प्लाॅट नं ७अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=×=

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...