शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

काय से दिल्ली म्हा !मजा ते से गल्ली म्हा !!

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

काय से दिल्ली म्हा !
मजा ते से गल्ली म्हा !!

उंडायाना हुपारा ऱ्हावो
नई ते थंडीना हिवाया 
गल्ली म्हा बाज टाकी
बिनदास निजी जावा ...

बाज ले बाज लागी
लाईन बन त्या खाटा
नानभु मोठाभु जिभो
कसा वार बागे बठा ...

नानभु जपे सोताना
आंगलम्हा खाटवर 
बाज समत नानभु गायब
पाहयटे सापडे पारवर ...

आते सध्या आंगल
धाकला व्हई ग्यात 
मवरे सरकी गल्ल्या
चिव्व व्हई ग्यात ...

कपासीनी गाडी कसी
पह्यले मोकी चोकी फिरे
गल्ली मजानी दिखे कसी
जो तो गल्लीवर भारी भरे ...

✍️✍️✍️
विजय व्ही.निकम
धामणगावकर,
चाळीसगांव 
दि.३०/१०/२०२०

☘️🌸☘️🌸☘️🌸☘️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...