श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड आणि कुशल प्रशासक
भाग - ६०
गुतागुतीना कुट प्रश्न सोडायेत तव्हय महाराज मानसशास्त्राना चतरापना मा वापर करेत. फक्त कचेरीमा बशीसन ज्या गोष्टी ध्यानामा येतीस नही त्या गोष्टी सयरम्हायीन आसाच फेरफटका मारा की, महाराजस्ना ध्यानमा ये. बडोदा सयरमजार न्यारा न्यारा इभागमा फिरीसन कोठे रस्ता आखूड शे, कोठे रस्ता वयन ना घातक शे, कोठे जुनाट हायल्या धोकान्याशेत नहीते कोठे घाण कचरा साचेल शे, येस्नी सोता दखीसन त्या इभागना अधिकारास्ले आवश्यक सुचना करेत. एक दिन महाराज रावपुरा रस्तानी जायीरायंन्तात तव्हय तेस्ले दिसन की, रस्ता गयरा कोता शे, नी तेन्हामुये वाहतुकले जागाजागावरआडथळा व्हयी ह्रायन्हा आस तेस्ना ध्यानमा उन्ह. तो मुद्दाना रस्ता तेस्ले चवळा करना व्हताच. त्या रस्ताना काटले तेस्ले एक कबर दिसनी. रस्ता जर चवळा करान म्हण ते बाकीन अतिक्रमण लगेच हाटवता यीन, पण हायी खबर हाटायी ते धार्मिक भावना दुखावतीन. म्हणीसन हाऊ कूट प्रश्न सोडाकरता महाराजस्नी इचारचक्र चालु झायात. जमावले विवेक ह्रात नही. जमाव भावनासवर तरंगस. जमावना हायी मानसशास्त्राना महाराजस्ले आनुभव व्हता. तेस्ले उत्तर सापडन. तेस्नी आप्ला जेठा मुसलमान अधिकारीस्ले इश्र्वासमजार लिसन मनमजारली कल्पना समाजाडीसन सांगी. ती कल्पना आशी - रस्ताना काटले जी कबर शे ती रातोरात कोणलेबी न सांगता साफ करानी नी रस्ताना बाजुले काही फुटवर मोकी जागा शे त्या जागावर कबर रचानी आणि कबरवर निय्यी चादर चढायीसन मोहल्लामा अफवा पसारावानी की 'मौलाना बाबानी कबर तेनतेन्ही खरकी गयी. सोता महाराजसाहेब त्या पवथीर कबरवर फुलस्नी चादर चढावणार शेत' त्या निष्ठावान अधिकारीनी हायी काम कोणलेबी माहित न पाडता पाड, नी तव्हय महाराजसाहेब त्या कबरवर चादर चढावा करता उन्हात. त्यायेले काही मुसलमान पुढारी नी त्या अधिकारी स्वागत कराले हाजीर व्हतात. शेकडोगणती मुसलमान बंधु जमेल व्हतात. ढोलपोटझोड्यास्ना तळतल ढुमाक सुरु व्हत. दैवाना चमत्कारवर इश्र्वास ठेवणारा लोक बेभान नाची ह्रायन्तात. महाराजस्नी कबरवर फुलस्नी चादर चढाई नी दर्गा बांधाकरता काही रक्कम बी मंजूर कयी. तोच मव्हरे 'पिंपळा गेट दर्गा' म्हणीसन बडोदामा नामचीन शे. दोन च्यार महिनामा लोकस्ले त्या गोटना इसर पडावर रावपुरारस्ता चवळाकरानी योजना आखीसन आम्मल मजार आणी.
लक्ष्मीविलास पॅलेस बांधीसन तयार व्हवावर राजपरिवार तठे राव्हाले गये. त्यायेले राजमहाल रोड गयरा कोता व्हता. तो महाराजस्ले चवळा करणा व्हता नी बाजुले झाड बी लावना व्हतात. तसच राजवाडा कडथाईन सयरकडे जाणारा रस्ताबी कराना व्हतात. त्या खाताना अधिकारास्ले बलायसीन पस्ताना आंदाजपंचे आराखडा तयार करान सांग रस्ता चवळाकरना व्हयीन ते गयरी जमीन संपादित करनी पडीण नी तेन्हाकरता जमीन मालकस्ले नुकसान भरपाई बी देन्ही पडणार व्हती नी भरपाई गयरी मोठी असामुये ती योजना थोडा दिन तहकूब करान आस आधिकारीस्नी महाराजस्ले सुताड. महाराजस्नी तेस्ना सल्ला मान्य कया. पण त्या गुपचूप बसना नहीत. तेस्ना मन मा इचारचक्र चालु झायात. तेस्नी म्युनिसिपल अधिकारास्ले बलायसीन आसा हुकुम काढाले सांग की, "नया कर आकाराकरता बंगलाना मालकस्नी आप्ला बंगला नी तेन्हा आगलबगलनी जमीन नी योग्य किंमत म्युनिसिपलपालटी ले कळायी द्या. नगरपालिका ना तसा हुकुम काढामुये कर कमी बशीन म्हणीसन परतेकनी आप्ली जमीन नी किंमत गयरी कमी लायी. बाजारभावना पेक्षा कयीक पटनी कमी व्हती. मंग महाराजस्नी तीच किंमत लायीसन जमिन नी नुकसान भरपाई दिसन जमीन संपादन कयी नी राजमहाल रोड चवळाचटक कया बाजुले झाड बी लावात.
अधिकारी वर्ग समधानी ह्राहण चांगल प्रशासन ना करता गरज न शे ग्रामीण भागमा अधिकारीस्नी परवान ना जास्ती नजीक जायीसन तयमय करीसन कार्य करान म्हणीसन समद्या सुखसोयीस्न भरेल आसा डागबंगला पयदा कयात. कर्तबगार नोकरस्नी कायजी करणारा आसा लोककल्याणकारी राजा मियन विरयच!
आप्ला सहवास मजारला लोक आप्ले जे सांगतस तेस्ना खर खोट तपासाशिवाय, दखाशिवाय महाराज कव्हय बी मव्हरली कृती नही करेत. तेन्ह एक उदाहरण मानसिंगराव गायकवाड सांगतस - शिपानी महाराजस्ना कपडा तयार करीसन खासगी कारभाराकडे आणीसन दिन्हात. नी महाराजस्ना रिचर्ड ह्या व्हॅलेकरता इस रुप्या टीप कारभारी कडे दिन्ही. रिचर्ड त्या दिन रजावर असामुये अधिकारीनी त्या इसरुप्या सस्पेन्स खाता मा टाकात शिपानी पैसा देल शेत आस कोणी तरी रिचर्ड ले सांग. तेल्हे पयसा नहि मियामुये तेन्हा गैरसमज आसा झाया की, कारभारी नी परस्पर पयसा खायी लिन्हात. एक दिन पेहराव करत असतांना तेस्ना पायमा मोजा घालतांना व्ह॑लेनी टिपना पयसा माल्हे मियना नहीत आशी तक्रार कयी महाराजस्नी शांततामा बठ्ठ आयकी. लिन्ह तव्हय त्या काहीच बोलणा नहीत. दुसरा दिन खात तपासणी करतांना इस रुप्याना बारामा सस्पेन्स खाताना बारामा इचार, तव्हय तेस्नी सांग टिपना पयसा व्हॅलीले देवाना राहेल शेत. तव्हय कारभारीनी काही चुक नही आस तेस्ले समजन. व्हॅलीनी चुहलभटारापणामुये तेन्ही दुसरा खातामा बदली कयी.
आप्ला अधिकारीस्ले महाराज गयरा सहानुभूती नी समतोल बुध्दीमा वागेत. तेन्हा बारामा आनंदराव पवार एक उदाहरण सांगतस, "बगीखाना कामदारना हुद्दावर व्हतात तठे तेस्ना हातावरी काहीतरी नकयता चुक व्हयलमुये तेस्नी हत्तीखानवर बदली करीसन त्या प्रकरणा मी चवकसी कयी. तेन्हा नंतर हत्तीखानामा तेन्ही एक महत्त्वानी सुधारणा घडायी आणी. ती महाराजस्ले गयरी आवडनी. कर्सेचजींस्ले महाराजस्नी लगोलग शाबासकी दिन्ही माल्हे नवल वाटामुये मी तेस्ले इचार, तव्हय त्या बोलणात, "शाबासकी काबर देवु नको? एखादा आरोप व्हयीन ते त्या माणुस्मा दुसरा ह्राव्हानहीत आस थोडी ह्रास.? आणि जशी चुक तशी शिक्षा उन्हीच. तसच हायी बी शे चांगला गुण असतीन ते शाबासकी देव्हालेच जोयजे. जन्मभर आरोप उगावत बसणुत ते आप्लाज हात काया व्हतीन" एखादा माणुस्ना बारामा तेन्ह्या चांगल, वाईट कामनुसार तेन्हा संगे आप्ल मन स्वच्छ ठेवाकरता मन ना समतोलपणा लागस. तो गुण महाराजस्मा व्हता. सुरवातना कायले आनाडी लोक मोठल्ला हुद्दावर ह्राहेत. म्हणीसन आनंदराव पवार येस्नी महाराजस्ले इचार," आम्हणा सारखा आनाडी लोक खाशास्ना कामकरता ठेयेलमुये खाशास्ले तकलीफ व्हत नसीन का?'महाराज बोलणात," हायी तुम्हणी चुक शे हुद्दावर काम कराले फक्त सिक्सन नी गरज नही लागस, ते शहाणपणवर आलंबन शे. बुध्दीना वापर करीन तो कोणले बी काम मा यीन "समर्थस्नी शिकवणूक महाराजस्ना आंगे पुरी पडेल व्हती.
अधिकार पाहून कार्य सांगणे /
साक्षेप पाहोन विश्वास ठेवणे /
आपला मगज राखणे /
काहीतरी /
लंडनमजार महाराजस्ना एक सत्कार समारंभ मजार भारतनामंत्री सॅम्युअल होअर बोलणात, "सयाजीराव महाराज ह्या फक्त हिंदुस्थाननाज नही, ते जगदुन्यामजारना हल्लीना बठ्ठा राजा लोकस्मा श्रेष्ठ शेत. इतला दिर्घकायलगुन तेस्नी मोठ्या संस्थानवर आक्कलहुशारीनी, सहानुभूतीनी, नी दुरदर्शीपणानी राज्य कये. हायी गोट तेस्नी भुषण वाटा सारखी शे." अध्यक्षीय भाषणमा मुंबईना माजी गव्हर्नर लाॅर्ड लॅमिंग्नट बोलणात," महाराज सयाजीराव गायकवाड येस्नी प्रशासणशास्त्रना जितला उपयोग कया तितला उपयोग करणारी दुसरी व्यक्ती माल्हे तरी माहित नही. "
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६